Why Professional Translator?
आज मी तुम्हाला दोन प्रसंग सांगणार आहे.
पहिला प्रसंग -दिवस होता 19 सप्टेंबर 2014.
- चीनचे राष्ट्राध्यक्ष शिन जिन पिंग भारत भेटीसाठी आले होते. एका वृत्त निवेदकाने सकाळच्या बातम्या देताना XI JIN PING हे त्यांचे नाव (XI रोमन अंक अकरा असे समजून) अकरावे जिन पिंग असा उल्लेख केला. एखाद्याचे नाव लिहिताना किंवा उच्चार करताना चुका करणे हे अक्षम्य आहे. या बाबतीत तर एका बलाढ्य देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या नावात चुक होणे, हे तर खूपच गंभीर. परिणामी त्यादिवशी दुपारीच त्या वृत्त निवेदकास नोकरीस मुकावे लागले.
दुसरा प्रसंग एका प्रसिद्ध कंपनीच्या जाहिरातीविषयी.
- त्या कंपनीने जाहिरात दिली – Applications are invited for the post of part-time Doctor for our clinic at regional office.या जाहिरातीचे मराठी भाषांतर करुन दुस-या दिवशी मराठी वृत्तपत्रात जाहिरात आली. …….. या कंपनीच्या प्रादेशिक कार्यालयातील क्लिनिक साठी अर्धवट डॉक्टरच्या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर वाचकांमध्ये आणि डॉक्टर मंडळीमध्ये जो काही -गोंधळ झाला असेल तो आपण सूज्ञ वाचक जाणू शकता.
- वाचकहो, तुमच्या लक्षात आले असेल की या दोन्ही प्रसंगामध्ये एका भाषेतील मजकूर दुस-या भाषेत अनुवादित(translate) करताना जर योग्य ती काळजी घेतली नाही तर अनर्थ घडतो. यासाठी आवश्यक असते ते मूळ भाषा (source language) आणि लक्ष्य भाषा (target language) वरील प्रभुत्व आणि भाषांतर करण्याचा अनुभव. यासाठी व्यावसायिक अनुवाद कंपनीची (Professional Translation Company) सेवा घेणे हे नेहमीच हिताचे आणि योग्य ठरेल.
- अर्थ, विपणन, शास्त्र, विज्ञान, क्रीडा, शेती, वैद्यक, औषधी, शिक्षण, इ- लर्निंग, जाहिरात, विधी, आरोग्य विज्ञान, संशोधन, सोशल मिडिया अशा अनेक क्षेत्रात अचूक भाषांतराची आवश्यकता असते.
- कोणत्याही दोन भाषांवर प्रभुत्व असलेली व्यक्ती या कौशल्याचे व्यवसायामध्ये रुपांतर करु शकते. आपल्याला माहितच आहे की,भाषांतर करणे हे उच्च प्रतीचे बौद्धिक काम (highly intellectual job) आहे. याव्यतिरिक्त, transcription, transliteration, interpretation, voice over, subtitling अशा संलग्न सेवांकरिता तुमचे प्रभुत्व उपयोगी ठरु शकते.
- वर उल्लेख केलेल्या प्रकारच्या चुका टाळण्यासाठी तसेच परिणामकारक अनुवादाची सेवा मिळविण्यासाठी, अचुक भाषांतर सेवा पुरवणा-या होनयाकू रेमिडीज या नामांकित ट्रान्सलेशन कंपनीची सेवा आपण घेऊ शकता.